अखेर बेस्टच्या ४१ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

- Advertisement -

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना साडे पाच हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे बेस्ट नियोजित संप मागे घेण्यात आला आहे.  बेस्ट उपक्रमाला सानुग्रह अनुदानासाठी बेस्ट कमिटी २५ कोटी रूपये देणार आहे.

मुंबई महापालिका एकूण ४१ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे. भाऊबिजेच्या दिवशीच कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता. मात्र महापालिकेला हा तिढा सोडवण्यात यश आलं आहे.

ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी २१ ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता.

- Advertisement -
- Advertisement -