Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर ५०० उठाबशांची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेस अटक!

अखेर ५०० उठाबशांची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेस अटक!

कोल्हापूरविद्यार्थिनीला ५०० उठाबशांची शिक्षा सुनावणाऱ्या मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांना अटक करण्यात आली आहे. विदयार्थीनीचे पाय स्थिर राहत नसून प्रकृती चिंताजनक बनली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली होती. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला ५०० उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. ३०० उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली होती. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. सध्या तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे. तिला मानसिक धक्का बसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मुख्याध्यापिकेवर कारवाई करू असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार या मुख्याध्यापिकेचा  पगारही बंद करण्यात आला होता. विदयार्थीनीला शिक्षा दिल्यामुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments