Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

अखेर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द

मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी साठेंबाबतचा चौकशी अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. साठेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी आरोपींच्या बचावासाठी मदत केल्याचा ठपका स्वाती साठेंवर ठेवण्यात आलाय. याबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं ९ ऑगस्ट २०१७ ला समिती स्थापन करण्यात आली. राज्य सरकार स्वाती साठेंना पाठीशी घालत असल्याची टीकाही करण्यात आली. स्वाती साठ्येंबाबतचा चौकशी अहवाल विधान परिषदेत लेखी सादर करण्यात आलाय.

मंजुळा शेट्येचा भायखळा जेलमध्ये २४ जूनला मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या मारहाणीनंतर मंजुळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी आणि पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली होती. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसंच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments