…अखेर नारायण राणे यांचा पत्ता कट!

- Advertisement -

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा विधानपरिषद पोटनिवडणूक रिंगणातून पत्ता कट झाला आहे. शिवसेनेच्या विरोधा नंतर भाजपाने नांग्या टाकत राणे यांना उमेदवारी देणार नसल्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना दिला. भाजपामधून आता उमेदवार कोण यावरुन अंतर्गत वाद सुरु असून उमदेवार जाहीर करण्यासाठी उशीर लागत आहे.

भाजपने उमेदवार दिला, तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका अद्याप समोर आली नाही. पुढील महिन्यात ७ डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राणे यांचे काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना या सर्वच पक्षांशी चांगले संबंध नसल्यामुळे, शिवसेनेच्या भूमिकेमुळे राणेंचा राजकीय प्रवास अडचणीचा ठरणार आहे.

- Advertisement -