Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास'कार्यक्रमात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’कार्यक्रमात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwarमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ‘दुष्काळ व्हावा भूतकाळ’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक २१ जून २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. दिलखुलास’ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रावर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत सोमवार दि. २४ व मंगळवार  दि. २५ जून २०१९  रोजी  प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

राज्याचा सन 2019-20 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये, शासन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करत असलेल्या उपाययोजना, कृषी व उद्योग आणि रोजगार क्षेत्राची सद्यस्थिती, राज्य उत्पन्नात कृषी आणि संलग्न क्षेत्राचे योगदान, एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्यासाठी शासनाचे प्रयत्न याबाबत सविस्तर माहिती  श्री. मुनगंटीवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments