Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत वाळकेश्वरात इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग!

मुंबईत वाळकेश्वरात इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग!

मुंबई : मुंबईतील वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग लागली होती. आताही आग आटोक्यात आलीय. ३२ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागली होती. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण आणल्यामुळे जीवीतहानी टळली.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास लिजेंड या ३२ मजली इमारतीच्या १७ आणि १८ व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ८ फायर इंजिन आणि ८ वॉटर टँकर्स पोहोचले असून आग विझवण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. अखेर दोन तासांच्या आग आटोक्यात आली.

उच्चभ्रु अशा या वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचेही फ्लॅट आहेत. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments