- Advertisement -
पुणे – पुण्यामध्ये ५ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची ५ वाहनांना धडक बसली. यामध्ये बाईक आणि दोन चारचाकींचा समावेश होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अप्पर इंदिरा नगर परिसरातील ही दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
- Advertisement -