जीप-टँकरच्या अपघातात सोलापूरचे पाच ठार

- Advertisement -

सोलापूर: कलबुर्गी (कर्नाटक) येथे झालेल्या क्रूझर व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैराग येथील एक कुटुंब जीपमधून कर्नाटकात लग्न समारंभासाठी जात होते. कर्नाटक हद्दीतील कलबुर्गी-हुमनाबाद महामार्गावर औराद गावाजवळ आल्यानंतर कर्नाटकातून येणाऱ्या टँकर (केए ३२ सी ४५४६) व जीपची समोरासमोर धडक बसली. यात जीपमधील पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच कलबुर्गी पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली आणि जखमींना वेळेवर मदत केली. या घटनेनंतर वैराग गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -