Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री भास्कर जाधव यांची शुक्रवारी घरवापसी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री भास्कर जाधव यांची शुक्रवारी घरवापसी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री कोकणातील नेते भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करून ते घरवापसी करणार असल्याची माहिती जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या काही दिवसांपासूनच भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. मात्रते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेना पक्षात याबाबत उत्सुकता होती. अखेर जाधव यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेत ही उत्सुकता संपवली. भास्कर जाधव हे मूळचे शिवसैनिक. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या भास्कर जाधव यांनी काही कारणाने शिवसेना सोडली आणि शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने त्या वेळी शिवसेनेला कोकणात जोरदार धक्का बसला होता. मात्रमूळचे शिवसैनिक असलेल्या भास्कर जाधव यांचे मन गेल्या काही काळापसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले होते.

दरम्यानभास्कर जाधव हे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. कोकणातील एक प्रमुख नेते अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. आक्रमक स्वभाव आणि आक्रमक भाषणासोबतच आक्रमक राजकारण असे जाधव यांचे व्यक्तीमत्व आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments