Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईच्या शाखेत हजारो कोटींचे गैरव्यवहार!

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईच्या शाखेत हजारो कोटींचे गैरव्यवहार!

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील एका शाखेमधून काही बँक खात्यांच्या व्यवहारांमध्ये हजारो कोटी रूपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत.याबाबत पंजाब नॅशनल बँकेने संबंधित तपास यंत्रणेकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बँकेने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, मुंबईतील पीएनबी बँकेच्या एका शाखेमधून गेल्या काही दिवसांमध्ये हे संशयास्पद आणि बेहिशेबी व्यवहार झाले आहेत. या खात्यांमध्ये ऐवढी मोठी रक्कम कुठून आली आणि त्यामागचा उद्देश काय हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने बँक प्रशासनाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या व्यवहारांचा कुणाच्या फायद्यासाठी वापर केला गेला आहे, याबाबत तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments