Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार!

मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार!

भंडारा – जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले. यामध्ये जिल्ह्यातील जवान मेजर प्रफुल्ल आंबादास मोहरकर (३२) यांना वीरमरण आले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. ४ जानेवरीला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होणार होती, त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शनिवारी या घटनेची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मिळाली तेव्हा त्यांची पत्नी माहेरी पुणे येथे होती आणि आई-वडीलही पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, माहिती मिळताच पुलगाववरून परत आले.
मूळचे पवनी तालुक्यातील पवनी शहरात राहणारे प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जुनोना गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरचे संपूर्ण शिक्षण बाहेरच झाले. १२ वीनंतर इंजिनिरिंग केले. मात्र, देशसेवेचे ध्येय असल्याने इंजिनियरिंग सोडून त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळविला. ८ वर्षांपूर्वी त्यांची लेफ्टनंट म्हणून आर्मीत भरती झाली होती. पदोन्नती होऊन ते मेजर पदावर गेले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे अबोली मोहनकर यांच्याशी लग्न झाले. त्यांचे वडील अंमबादास मोहरकर सेवा निवृत्त शिक्षक आहेत तर आई शिक्षिका आहेत. लहान भाऊ परेश मोहरकर पुण्यात नोकरी करतो.  प्रफुल्ल विषयी त्यांच्या आईला विचारले असता, त्यांनी सांगितले, की तो सुरुवातीपासूनच हुशार होता आणि त्याला देशसेवा करण्याची इच्छा होती.  तिथे जर वीरमरण आले तर त्याचा मला गर्व असेल. त्यामुळे आज मला त्याचे शब्द आठवत आहेत. मला अभिमान आहे माझा मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा. मात्र, हे सांगताना ती माता आपल्या लेकरासाठी हंबरडा फोडत होती.

Bhandara, Maharashtra: Family of Major Moharkar Prafulla Ambadas mourns the loss of their son who passed away in ceasefire violation by Pakistan in J&K yesterday; mother says “my son had promised to visit us next year, but for us, now that year is never going to come” pic.twitter.com/CJ20qqb9FZ

सैनिकांवर कामाचा ताण खूप वाढला असल्याचे प्रफुल्ल सांगत होता, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची विनंती त्यांनी केली. अजून किती आईची लेकरं हिसकावली जातील, कधी या दोन्ही देशात शांतता निर्माण होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रफुल्ल शहीद झाल्याची बातमी गावात पसरल्याने प्रत्येकजण घरी येत होते. त्याच्या शेजारील मित्रांनी प्रफुल्ल मनमिळावू वृत्तीचा आणि अभ्यासू असल्याचे सांगितले. तो नेहमी देशाविषयी बोलायचा, आर्मीत असूनही त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती. तो आमचा मित्र असल्याचा आम्हाला गर्व आहे, असे प्रफुल्ल यांच्या मित्रांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments