Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gang rape of a minor girl in Solapurसोलापुर : येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पीडित मुलगी हि महाविद्यालयात शिक्षण घेते. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. मंगळवारी(11 फेब्रुवारी) दुपारी पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीच्या चौकशीतून समोर आलं.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील 10 पैकी 5 आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. इतर आरोपींच्या शोधत पोलीस पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणात भादंवि कलम 376(ड), पॉक्सो आणि अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments