8 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला प्रतीक्षा महाव्यवस्थापकाची

- Advertisement -

western railway, mumbai, mumbai local, wr train, wr local train, anil galgali

रेल्वे सेवेत अग्रणीय असलेल्या पश्चिम रेल्वेला रेल्वे मंत्रालय दुजाभाव वागणुक देत आहे. मागील 8 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक नसल्याची कबुली माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापक बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेच्या उप मुख्य कर्मचारी अधिकारी रामप्रसाद बी यांनी अनिल गलगली यांस कळविले की 1 फेब्रुवारी 2022 पासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त आहे. सद्या प्रकाश बुटानी जे अप्पर महाव्यवस्थापक आहेत त्यांस प्रभार देण्यात आला आहे. या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकरण रेल्वे बोर्ड असून सक्षम प्राधिकारी यांच्या नावाची माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला.

- Advertisement -

अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री आणि प्रशासनास पत्र पाठवून मागणी केली आहे की तत्काळ हे रिक्त पद भरण्यात यावे.


Web Title: Western Railway’s General Manager post vacant since last 8 months

- Advertisement -