Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्‍ट्रआंबेडकर जयंती मिरवणुकीत गिरीश महाजन लेझीम नृत्यवार थिरकले

आंबेडकर जयंती मिरवणुकीत गिरीश महाजन लेझीम नृत्यवार थिरकले

girish mahajan

जळगाव : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील लेझीम नृत्यावर थिरकतांना पाहायला मिळाले.

गिरीश महाजन हे गेल्या २५ वर्षांपासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. या मिरवणुकीमध्ये ते केवळ सहभागीच नव्हे तर त्यात लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूकभर नाचत देखील  ठेवली आहे.
जामनेर शहरात जयभीम नगरातून निघालेल्या मिरवणुकीत खास निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचत असताना बघायला मिळाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थितांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments