Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या मूळावर उठलेले सरकार – अजित पवार

शेतकऱ्यांच्या मूळावर उठलेले सरकार – अजित पवार

वर्धा – उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे आणि विजय मल्ल्याला परदेशात पळण्यासाठी मदत करणारे हे माझ्या कष्टकऱ्यांचे सरकार नाही. खऱ्या अर्थाने माझ्या शेतकऱ्यांच्या मूळावर उठलेले हे भाजप सरकार असून जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी वर्ध्यामधील सर्कस मैदानावर झालेल्या सभेत सरकारला दिला.

अजित पवार यांनी या सभेत सरकारवर जबरदस्त आसूड ओढले. देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकाच्या कारभारावर आणि निर्णयावर हल्लाबोल केला. या दळभद्री सरकारच्याविरोधात म्हणूनच हल्लाबोल पदयात्रा सुरू केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारला तीन वर्ष झाली, अजुन किती महिने, किती वेळ थांबायचे, किती कुटुंब उद्ध्वस्त करणार, ३०२ कलमाचा गुन्हा कुणावर दाखल करणार? असा संतप्त सवाल केला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यामध्ये ६५ हजार कुपोषित मुले मृत्यूमुखी पडली आहेत. यांना कळत नाही, त्यांना पोषण आहार द्यायचा, अशी टीका अजित पवारांनी केली.
गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत हे आमच्या सरकारच्या काळामध्ये धोरण होते. ५०० कोटीच्या शिष्यवृत्या देत होते. पण आज शिष्यवृत्या मिळत नाही आहेत. राज्यातील १५०० शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आमच्या ग्रामीण भागातील गरीब मुलांनी शिकू नये, असा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. दिवसाढवळया हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. राज्यसरकारची पकड प्रशासनावर राहिलेली नाही. काय करतेय सरकार, याला कोण जबाबदार, कोण राजीनामा देणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अजित पवार यांनी सभेत विचारला.
१५ वर्षाच्या नवसाने तुमचे सरकार राज्यात आले. परंतु आमच्या मराठवाडयामध्ये एक म्हण आहे नवसाने आलेले मुक्याने मारले. तसे भ्रष्टाचाराने सरकार मुक्याने मरु नये अशी टिका विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्धातील जाहीर सभेत केले. त्यांनी छत्रपतींचे नाव घेवून शेतकऱ्यांची फसवणूक करताना या भाजप सरकारला लाज का वाटत नाही असा संतप्त सवाल सरकारला केला. या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील,माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आदींसह वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments