Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादहज हाऊसचे काम पुढच्या वर्षी पूर्ण होणार

हज हाऊसचे काम पुढच्या वर्षी पूर्ण होणार

औरंगाबाद: औरंगाबाद हज हाऊसचे काही महिण्यांपासून काम रखडले आहेत. रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनजागरण समितीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे केली. यावेळी बकोरीया यांनी डिसेंबर २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. असे आश्वासन समितिच्या शिष्टमंडळाला दिले.

मराठवाड्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक हज यात्रेसाठी जातात. हज यात्रेकरुंना औरंगाबाद चिकलठाणा विमानतळावरुन थेट हज यात्रेसाठी जाण्याची सोय आहे. मराठवाड्यातून भाविक औरंगाबादला येतात व येथूनच हज यात्रेसाठी रवानगी होते. येथे दिव्यभव्य हज हाऊस बांधण्याचे काम काही वर्षापासून सुरु आहे. परंतु पाच महिण्यापासून हज हाऊसचे बांधकाम बंद आहे. यामुळे हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना थांबण्याची गैरसोय होत आहे. हज हाऊसचे काम लवकरात लवकर झाले तर गैरसोय दूर होईल अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत लवकरच हज हाऊसचे राहिलेले काम पूर्ण करुन इमारत हस्तांतर करण्यात येईल असे आश्वासन बकोरीया यांनी दिले. यावेळी जनजागरण समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक मोहसीन अहमद खान,शेख मुनाफ,आबेदा बेगम,इब्राहीम भैय्या पटेल,सलमाबानो यासह इतर पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments