Thursday, March 28, 2024
Homeविदर्भनागपूरहल्लाबोल मोर्चा : हे सरकार म्हणजे 'गोलमाल रिटर्न' सरकार!

हल्लाबोल मोर्चा : हे सरकार म्हणजे ‘गोलमाल रिटर्न’ सरकार!

नागपूर – शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजन केलेल्या जनआक्रोश मोर्चाला आज दुपारपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी मोर्चाचे नेतृत्व शरद पवार तर काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व गुलाम नबी आझाद यांनी केले.

नागपूरमधील धनवटे कॉलेज येथून राष्ट्रवादीच्या मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून वाढदिवस असतानाही शरद पवार या मोर्चात सहभागी झाले होते.
विखे-पाटील यांचे भाषण –
-कोट्यवधी रुपयांची केवळ जाहिरातबाजी या सरकारने केली. बोगस कर्जमाफी केली. हे सरकार गोलमाल रिटर्न सरकार आहे. गेल्या तीन वर्षात दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारचे दोनच लाभार्थी आहेत एक भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे.
– आपला हक्क मागणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे हे सरकार आहे- विखे
– शरद पवार यांचे सभेच्या ठिकानी आगमन

धनंजय मुंडे यांचे भाषण 
– माझ्या वतीने तमाम जनतेच्या वतीने पवार साहेबांच्या वाढदिवशी त्यांचे अभिष्टचिंतन करतो..
– खोटे बोल पण रेटून बोल असे हे सरकार आहे.
– मुख्यमंत्री स्वतः शेतकरी असल्याचा दावा करतात, लोक हो तुम्ही सांगा कुठून मुख्यमंत्री शेतकरी दिसतात…
– या तीन वर्षात राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कर्जमाफीचा निर्णय होऊनही दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला मुख्यमंत्री तुम्ही जबाबदार आहात-मुंडे
– कापसाला २५ हजार प्रतिएकरी तर धानाला १० हजार एकरी मदत मिळालीच पाहिजे- मुंडे
– हा निर्वाणीचा इशारा आहे, ज्या महाराष्ट्राने तीन वर्षांपूर्वी डोक्यावर घेतले, तीच जनता पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही- मुंडे

जोगेंद्र कवाडे यांचे भाषण – 
– जनता या सरकारला स्मशानात पाठवल्याशिवाय राहणार नाही-
– आता विरोधक एकत्र होऊन जनकल्याणाचा जाब आम्ही सरकारला जाब विचारत आहोत. पंतप्रधान मोदी यांनीही सत्तेवर यायच्या आधी जनतेला खोटी आश्वासने दिली.
– फडणवीस यांनीही गेल्या तीन वर्षात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, बडे मियाँ सो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह अशी स्थिती आहे.
– २०१९ च्या निवडणुकीसाठी हत्यारे तयार ठेवा, सरकारच्या विरोधात तुतारी वाजवा….
अबू आझमी भाषण -किसानो को कर्जमाफी देणे के लिये इनकी नानी मर रही है
– जन आक्रोश आणि हल्लाबोल मोर्चा प्रचंड यशस्वी झाला आहे. खरच महाराष्ट्रात भाजपविरोधात आग आहे. हे सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर जनतेला संभ्रमित करत आहे. लोकांनी सरकारच्या विरोधात उभे राहावे.. या सरकारच्या काळात आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.. ” किसानो को कर्जमाफी देणे के लिये इनकी नानी मर रही है”
– शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करा..
– आपले सगळे मतभेद मिटवून सरकारच्या विरोधात एक व्हा…आवाहन केले..
शेकाप नेते … जयंत पाटील
-१९८० मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी दिंडी काढण्यात आली होती, त्या दिंडीची आठवण या ठिकाणी येत आहे.
-सरकारची कर्जमाफीची फसवेगिरी थांबवली पाहिजे..  जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार नाही, तो पर्यंत आम्ही विधिमंडळ चालू देणार नाही. उद्यापासून विरोधक अधिकच आक्रमक होतील..
-पवार साहेबांनी आदेश द्यावा पुन्हा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू..
सुनील तटकरे यांचे भाषण
– पवार साहेब आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल आज ही जनता पवार साहेबांना शुभेच्छा देत आहे.
-कर्जमाफी जाहीर करून तीन महिने झाले तरी प्रमाणपत्र दिले तरी शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाहीत…
-पवनारमध्ये फुललेले शेत शेतकऱ्याने जमीनदोस्त केले.. अजूनही कापसाच्या नुकसान भरपाई देण्याचा सरकार निर्णय घेत नाही..
-आता स्वस्त बसून चालणार नाही, कल्याणकारी राज्य आणण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे…सुप्रिया ताईना मी धन्यवाद देतो.. त्यांनी १५४ किलोमीटरची पदयात्रा काढून सरकारला धारेवर धरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments