‘अपयश लपवण्यासाठी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘नौटंकी”- भंडारी

- Advertisement -

महत्वाचे…
१. भाजपाकडे चांगल्या कार्यकर्त्यांची फौज २. कोणत्याही आमदारावर डोळा नाही ३.आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अपयश लपवण्याचा प्रकार


मुंबई: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, हा शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आरोप भाजपने फेटाळला. आपले अपयश लपवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांकडून अशी नौटंकी केली जात असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.

जाधव यांचा हा आरोप बिनबुडाचा असून, असले उद्योग करण्याची भाजपला गरज नाही. आमचा कोणत्याच आमदारावर डोळा नसून भाजपकडे चांगल्या कार्यकर्त्यांची फौज आहे. आपले अपयश लपवण्यासाठी जाधव असले नाटक करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्याला भाजपकडून उत्तर देण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -