मनसे जिल्हाध्यक्षासह सहा कार्यकर्त्यांना सोमवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश

- Advertisement -

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान सहभागी असलेल्या पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. या सर्वांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

अविनाश जाधव यांना १ कोटी तर इतर ६ कार्यकर्त्यांना प्रत्येकी २५ लाखांचा जामीन भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान आज मनसेतर्फे युक्तीवाद करताना वकील राजेंद्र शिरोडकर यांनी फक्त जामीनाच्या रकमेचा प्रश्न नाही तर हे सगळे कार्यकर्त्ते काही सराईत गुन्हेगार नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात अशी नोटीस बजावणे गैर असल्याचं म्हटलंय. तर ठाणे पोलिसांनी आपल्याकडे या कार्यकर्त्यांविरोधात पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती असून ती सादर करण्यासाठी पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्याची विनंती कोर्टाला केली.

तसं असल्यास या कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिरोडकर यांनी केली. ठाणे पोलिसांनीही तोपर्यंत या कार्यकर्त्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -