Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भगोंदियाभंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना उमेदवारी!

भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना उमेदवारी!

मुंबईः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होईल.

राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments