Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'आदर्श'प्रकरणी अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

‘आदर्श’प्रकरणी अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई – आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने ही चौकशी बेकायदेशीर ठरवत अशोक चव्हाण यांना दिलासा दिला आहे.

आदर्श घोटाळ्यात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावरही बरेच आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळेही विरोधकांनी त्यांच्याविरोधात रान उठवले होते. दरम्यान, या प्रकरणी राज्यपालांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. याविरोधात अशोक चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने त्यांच्या विरोधातील ही चौकशी बेकायदेशीर ठरवल्याने चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments