Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक: गृहमंत्रालयात अधिकारी चक्क पॉर्न क्लिप बघायचे'

धक्कादायक: गृहमंत्रालयात अधिकारी चक्क पॉर्न क्लिप बघायचे’

GK pillaiमुंबई: ‘केंद्रीय गृहमंत्रालयातील कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी कामाच्यावेळी कार्यालयात चक्क पॉर्न सिनेमे बघायचे. व्हिडिओ डाऊनलोड करायचे, त्यामुळे अनेकदा व्हायरसमुळे संगणक बंद पडायचे,’ अशी धक्कादायक माहिती माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी उघड केली आहे.

जी. के. पिल्लई सध्या नॅसकॉमशी संबंधित डेटा सेक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया या एनजीओचे अध्यक्ष आहेत. ‘८-९ वर्षापूर्वी मी केंद्रीय गृहसचिव होतो. त्यावेळी दर दोन महिन्याने संगणकात बिघाड व्हायचा. कारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संध्याकाळपर्यंत बैठकांमध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांना उशिरापर्यंत कार्यालयात थांबावं लागायचं. अशावेळी वेळ घालविण्यासाठी हे लोक इंटरनेटवर अश्लिल संकेतस्थळांना भेट द्यायचे. अश्लिल सिनेमे डाऊनलोड करायचे. त्यामुळे त्याच्याबरोबर ‘मालवेयर’ व्हायरसही संगणकात घुसायचा आणि संगणक बंद पडायचे,’ असं पिल्लई यांनी सांगितलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गृहमंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यातही या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नुकत्याच १० सरकारी वेबसाइट बंद पडल्या होत्या. त्यात गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळांचाही समावेश होता. या साइट्स हॅक केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र नंतर हा सायबर हल्ला नसून तांत्रिक बिघाड असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. यापार्श्वभूमीवर पिल्लै यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments