पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

- Advertisement -

महत्वाचे…
१.कोल्हापुरातील घटना २. राजश्री यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सुभाष यांनी विष प्राशन केले ३. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज


कोल्हापूर पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. संतोष कुंभार व राजश्री कुंभार असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. संतोष यांचा चांदीच्या मुर्त्या तयार करण्याचा व्यवसाय होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते शुक्रवार पेठेत राहतात.

बुधवारी रात्री त्यांच्यात काही कारणाने वाद झाला. चिडलेल्या सुभाष यांनी राजश्री यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत राजश्री यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सुभाष यांनी विष प्राशन केले. शेजारच्यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. अत्यवस्थ असलेल्या सुभाष यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कुंभार दाम्पत्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -