Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमलाही युतीची चिंता : देवेंद्र फडणवीस

मलाही युतीची चिंता : देवेंद्र फडणवीस

युतीवरून सध्यातरी सस्पेंस कायम आहे. मात्र, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, युतीची चिंता असून योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करु. अशी हतबलता सोमवारी पत्रकार परिषदेत दर्शवली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की कॉर्पोरेट टॅक्सच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार “कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने गुंतवणूक वाढण्यास मदत मिळेल. कॉर्पोरेट टॅक्स २२ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय हा खूप धाडसी असल्याचं कौतुकही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. “ जागतिक स्पर्धेत आपण मागे पडत असल्याची अनेक उद्योजकांची तक्रार होती. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जावा अशी देशातील उद्योजकांची मागणी होती,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले.

“ आरे कारशेडला विरोध करत काहीजण आपले मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आरेसंबंधी काही लोकांची चिंता समजू शकतो. पण जेव्हा पर्यायी जागा आहे सांगितलं जातं तेव्हा अतिरिक्त पैसे खर्च करुन ती घ्यावी लागेल हे महत्त्वाचं आहे. एक रुपया जरी जास्त खर्च केला तर त्याचा परिणाम तिकीटाच्या दरावर आणि मुंबईकरांवर होईल,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

नेक अर्थतज्ञांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सल्ला दिला होता. निर्मला सीतारमन आणि नरेंद्र मोदींनी ती हिमंत दाखवली. महाराष्ट्र हे देशातलं सर्वांत मोठं कॉर्पोरेट हब असून त्याचा राज्याला फायदा होईल. जे पैसे वाचतील त्याच्यातून नव्याने गुंतवणूक होण्यास मदत मिळेल. तसंच रोजगार वाढीलाही हातभार मिळणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments