मराठी माणसावर हल्ला केल्यास खळ्ळखट्याक – राणे

- Advertisement -

मुंबई: मराठी माणसावर हल्ला केल्यास चारही बाजूने खळळ खट्याक होईल असा इशारा नीतेश राणेंनी दिला आहे. आज आमदार नितेश राणे यांनी मनसेचे सुशांत माळवदे यांची भेट घेतली यानंतर पत्रकारांशी बोलतांना इशारा दिला.

मराठी माणसाला कुठल्याही अनधिकृत फेरीवाल्यानं मारणं चालणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा का असे ना?असा इशारा दिल्यानंतर प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. काल फेरीवाल्यांकडून मनसैनिक सुशांत माळवदेला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आल होत. सुशांत माळवदे यांना बेदम मारहाणी नंतर ऑस्कर रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. राणे यांनी माळवदेची भेट घेतल्यानंतर मनसे विरुध्द फेरीवाला प्रकरणात उडी मारली. शिवसेना काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -