Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमी देशद्रोही असेन, तर जेलमध्ये का टाकले नाही? : कन्हैया कुमार

मी देशद्रोही असेन, तर जेलमध्ये का टाकले नाही? : कन्हैया कुमार

कोल्हापूर : मोदी सरकार मला देशद्रोही म्हणतं. मी जर देशद्रोही असेन, तर मला अद्याप जेलमध्ये का टाकले नाही?, असा सवाल विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने मोदी सरकारला उद्देशून विचारला. शिवाय, माझ्यावर एकतर देशद्रोही आहे असे आरोपपत्र दाखल करा, अन्यथा आरोपमुक्त करा, असं आव्हानही कन्हैयाने सरकारला दिले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील सभेत कन्हैया कुमार बोलत होता.

कोल्हापुरात आज ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तो म्हणाला, “या देशातील जनतेला मोदी फसवत आहेत. आणखी फसवायचे बंद करा, नाहीतर एक दिवस पळायला जागा मिळणार नाही.”

कन्हैयाने मोदींवर निशाणा साधताना म्हणाला, “मोदींनी खूप मोठी मोठी स्वप्ने दाखविली आणि खूप वायदे केले होते. नोटबंदीवेळी कोणताच मोठा मंत्री आमदार, खासदार, मोठे उद्योजक, कुणीही बँकेच्या लाईनमध्ये उभे राहिलेले दिसले नाहीत. यामध्ये फक्त गोरगरीब भरडला गेला.”

भ्रष्टाचाराविरोधात लढणारा हा भाजप पक्ष आता भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पार्टीमध्ये सामील करुन घेत आहे. जनतेला किती फसवणार आहे हे सरकार?, असा सवाल कन्हैयाने विचारला.

“गौरी लंकेश यांनी जे लिखाण केले होते त्यांना हिंदूविरोधी होत्या असे म्हणतात. पण त्या हिंदूविरोधी नाहीत तर देशातील हिंदू धर्माच्या नावाखाली जी लोकं राजकारण करत आहेत, त्याचा विरोध करत आहेत. या देशात सर्वच मुस्लिमांना गुन्हेगार ठरवत आहेत. सगळे क्रिमिनल आहेत असं दबाव आणत आहेत.”, असे मत कन्हैयाने मांडले.

राम मंदिराच्या नावाखाली नथुरामचा मंदिराचा जो कट रचत आहेत तो बंद करा, असे सुनावत कन्हैया पुढे म्हणाला, “भाजपची धोरणे देशाच्या एकतेविरुद्ध आहेत. देशाची एकता भंग करण्याचे काम हे सरकार करत आहे. या देशात एक राष्ट्र, एक दल, एक नेता जे स्वप्न आहे ते आत्ताच मोडून काढायला हवं. त्यांना या १०० वर्षांच्या आत संविधान बदलायचं आहे. देशाचा झेंडा बदलायचा आहे. हे थांबवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. मी निवडणूक लढवणार नाही, पण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करु.”

दरम्यान, कन्हैया कुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहात बाहेर मोठा तणाव निर्माण झाला होतो. या वेळी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा बाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments