होम महाराष्ट्र शिवसेनेला भाजपा सोबत यायचे नसेल तर नका येऊ… मुनगंटीवार

शिवसेनेला भाजपा सोबत यायचे नसेल तर नका येऊ… मुनगंटीवार

32
0

sudhir mungantiwar, BJP, Shiv Senaमुंबई: शिवसेनेला भाजपा सोबत युती करायची नसेल तर ते त्यांचा निर्णय घेण्यासाठी मोकळे आहेत. ते त्यांचे उमदेवार उभे करतील आम्ही आमचे उमेदवार उभे करु अशा प्रतिक्रिया महाराष्ट्राचे अर्थमंत्री,भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहीनिशी बोलतांना व्यक्त केला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी भेटण्यासाठी वेळ मागीतला होता. मात्र ठाकरे यांनी भेट नाकारल्याने भाजपाच्या चांगल्याच जिव्हारी लागले. भेट नाकारली नाही असं म्हणता येणार नाही अशीही सारवासारव मुनगंटीवार यांनी केल. शिवसेना स्वतंत्र्य लढू शकते. त्यांना तो अधिकार आहे. परंतु पुन्हा काँग्रेस,राष्ट्रवादी सत्तेत परत येऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढतील असाही इशारा त्यांनी दिला.