औरंगाबादेत नोटबंदी विरोधात काँग्रेसचे मुंडण आंदोलन

- Advertisement -

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार,माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड,माजी नगराध्यक्ष,माजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इब्राहीम पठाण, दिनेश परदेशी, एम. ए. अजहर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले.

- Advertisement -