Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रइंदापूर बँकेच्या संचालकांने ‘या दोन मंत्र्यांना’ आत्महत्येस जबाबदार ठरवले

इंदापूर बँकेच्या संचालकांने ‘या दोन मंत्र्यांना’ आत्महत्येस जबाबदार ठरवले

Vasant Pawar

पुणे : शेतीसाठी कालव्यातून पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्याने जीवन संपवलं आहे. वंसत पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून ते इंदापूर अर्बन बँकेचे संचालकही आहेत. घराजवळील विहिरीत उडी मारुन वसंत पवार यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस जलसंपदा मंत्री वियज शिवतारे, पालकमंत्री गिरीष बापट हे दोघेही आत्महत्येस जबाबदार असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपल्या मित्रांनी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असाही उल्लेख वसंत पवार यांनी चिठ्ठीत केला आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे इंदापूर येथे संतापव्यक्त करण्यात येत आहे. मात्र मंत्र्यांचे नाव चिठ्ठीत नमूद केल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.संतापव्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments