Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रलोकलमध्ये इंडिया टीव्हीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!

लोकलमध्ये इंडिया टीव्हीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!

मुंबई : मुंबई पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर १५ ते २० गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. ते इंडिया टीव्हीमध्ये कार्यरत आहेत. मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना १५ ते २० जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. विले-पार्ले येथील कुपर रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे. लोकलमध्ये टोळक्याने चढणा-या प्रवाशांचा त्यांनी विरोध केला होता. या प्रकारामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्ना मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना लोकलमध्ये गुंडांनी शुक्ला यांना चढण्यास विरोध केला होता. पण अखेर प्रयत्न करून शुक्ला गाडीत चढले, आणि नंतर त्या गुंडांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर गुंडांनी शुक्ला यांना मारहाण कऱण्यास सुरूवात केली. अंधेरीच्या जीआरपी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशने या घटनेची निषेध नोंदवला असून कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा लटकल्यामुळे पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नागपूर येथे पत्रकाराच्या आई आणि मुलीचे अपहरण करुन खून करण्यात आलं होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments