Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रसाईंचे दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख घालावा,अन्यथा...

साईंचे दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख घालावा,अन्यथा…

शिर्डी l शिर्डीमधील साई मंदिरात दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

मंदिरात येताना भक्तांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान  करुन यावे असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाताय? मग आधी ही नियमावली नक्की वाचा

– दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास घ्यावा लागणार आहे.
– ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे.
– ३००० भाविकांना ऑनलाइन पेड पास दिला जाणार आहे.

– आरतीनंतर गावकऱ्यांना दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार. मतदार ओळखपत्र दाखवल्यानंरच प्रवेश दिला जाईल.
– ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारनेच तसा आदेश दिला आहे.
– साई निवास व्यवस्थेसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.
– मास्क बंधनकारक असणार आहे.
– थर्मल स्क्रिनिंग आणि नियम पाळणं बंधनकारक आहे.

– एरव्ही आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.
– हार, फुलं, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही. समाधीला हात न लावता दर्शन घेता येणार.
– मोबाइल आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाचा : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments