होम महाराष्ट्र मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत

मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत

24
0

मुंबई : कर्नाटकात २२२ पैकी १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपने सत्ताग्रहण केली आहे. आज सकाळी येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणे अवघड असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

राऊत पुढे म्हटले, की ‘ कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. परंतु त्यांच्या अगोदर काँग्रेसने जेडिएसला पाठिंबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तसेच तसा प्रस्तावदेखील सर्वात प्रथम राज्यपालांकडे देण्यात आला होता. या आघडीला डावलून राज्यपालांनी आपले मत भाजपच्य पारड्यात टाकले. यामुळे लोकशाहीची हत्या झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. परंतु मला वाटते की देशात लोकशाही राहिलीच नाही तर लोकशाहीची हत्या कशी होईल.’