Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रजय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ वृत्तांत

जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ वृत्तांत

मुंबई : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ नुकताच मुंबई येथील सह्याद्री ‍ राज्य अतिथीगृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात दाखविण्यात येणार तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा विद्यापिठाचे प्रति – कुलपती गिरीष महाजन, कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलसचिव कालिदास चव्हाण, डॉ. अभय बंग आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग हे उपस्थित होते. यावेळी कुपोषणमुक्ती, आरोग्य आदी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना विद्यापीठाच्या वतीने डि. लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना यावेळी सन्मानचिन्हे देण्यात आली.

‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत दाखविण्यात येणार आहे. तर ‘दिलखुलास’ हा कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि. ३ आणि सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारण होणार आहे.या कार्यक्रमाचे निवेदन रेश्मा बोडके यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments