Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' मंत्र्याचे डॉ. बाबासाहेब आंडेकरांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याचे डॉ. बाबासाहेब आंडेकरांना पत्र

मुंबई l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा आज 6 डिसेंबर 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. असं पत्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन करा, असे आवाहन काही सामाजिक संस्थांकडून अनुयायांना करण्यात आलं आहे.

या सूचनेचं पालन करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातील मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

जयंत पाटील यांचे पत्र, वाचा जसेच्या तसे…

प्रिय बाबासाहेब,

“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत.म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!,” असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments