Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भनागपूरमुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या

मुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या

नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीने सत्र सुरुच आहेत. पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. येथे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविकांत कांबळे हे नागपूर टुडेचे पत्रकार आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल संध्याकाळपासून कांबळे यांची आई आणि मुलगी बेपत्ता होते. आज सकाळी दिघोरी नाक्याजवळ त्यांचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात खुलेआम हत्या होत आहेत. खुलेआम आरोपी गुन्हे करुन फिरत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments