Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याणमध्ये ‘श्रीपाद छिंदम तृतीय पंथीया’ च्या रुपात!

कल्याणमध्ये ‘श्रीपाद छिंदम तृतीय पंथीया’ च्या रुपात!

sripad chindam

कल्याण : आज तिथीप्रमाणे साज-या करण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना शाखेच्या वतीने देखावा उभारण्यात आला. या देखाव्यात अहमदनगरचा भाजपाचा माजी उपमहापौर याचा हिजड्या छिन्दमचा जाहीर निषेध असं फलक लावून त्याचा कटआऊट बनवण्यात आला. पोलिसांनी यावर हरकत घेतली आहे. हा देखावा काढून टाकण्याची नोटीस पोलिसांनी रामबागे शिवसेना शाखेला बजावली. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर भाजप माजी उपमहापौर छिंदम यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादगस्त व्यक्तव्याच्या निषेधार्थ त्यांचे कटआऊट शिवसेना शाखेच्या वतीने लावण्यात आले आहे. छिंदम यांना या तृतीय पंथीयाच्या रुपात दाखविण्यात आले आहे. कानात डूल, नाकात नथ, ओठाला लावली, गळ्य़ात चपलाचा हार घालण्यात आला आहे, असे त्यांचे चित्र कटआऊटद्वारे रंगविण्यात आले आहे. भारताविषयी अनुद्गार काढणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना एका पाकिस्तानी मुजरा नर्तकीच्या रुपात दाखविण्यात आले आहे. याशिवाय सिमेवर लढणा:या सैनिकांच्या कुटुंबियांविषयी अश्लाघ्य उद्गार काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे खासदार नेपाल सिंह यांच्याचेही धिंडवडे कटआऊट द्वारे काढण्यात आलेले आहे. मणीशंकर अय्यर सोडले तर उर्वरीत सगळी मंडळी भाजपची आहे. ज्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहे. याशिवाय शिवप्रतापचेची कट आऊय दाखविण्यात आलेले आहे. शिवाजी महाराजांनी अफजखानाचा कोतळा बाहेर काढला हे कट आऊट लावण्यात आलेले आहे. रामबागेचा शाखेने हा वादग्रस्त देखावा उभारल्याचे कळताच महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रामबाग शाखेला पोलिसांनी नोटिस बजावली असून देखाव्याविषयी हरकत घेतली आहे. वादग्रस्त देखावा तात्काळ काढून टाकण्यात यावा असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. या देखाव्यात व्यक्ती या भाजपच्या असून भाजपावर रामबाग शाखेने निशाणा साधल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावल्याचे रामबाग शाखेचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments