देशातील सर्वोत्तम १५ रुग्णालयांमध्ये केईएम ६ व्या क्रमांकावर!

- Advertisement -

मुंबई –  दर्जेदार उपचार आणि विविध आजारांवर संशोधन करणा-या भारतातील सर्वोत्तम १५ रुग्णालयांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत मुंबईतील केईएम रुग्णालयानेही स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये महापालिकेचे केईएम रुग्णालय सहाव्या स्थानावर आहे. केईएम पश्चिम भारतातील दुस-या क्रमांकाचे सर्वोत्तम सरकारी रुग्णालय आहे. 

विविध आजार आणि औषधांवर संशोधन करणा-या रुग्णालयांमध्ये केईएमचा पहिल्या दहा रुग्णालयांमध्ये समावेश होतो. वीक मॅगझिनने सर्वे करुन भारतातील पहिल्या पंधरा सर्वोत्तम रुग्णालयांची यादी प्रसिद्ध केली. केईएम पालिकेचे मुंबईतील सर्वात मोठे रुग्णालय आहे. वास्तविक केईएम रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

- Advertisement -