होम उत्तर महाराष्‍ट्र जळगाव गोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या!

गोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या!

24
0

petrol pump ownerअमळनेर, जि. जळगाव- बोहरी पेट्रोल पंपाचे मालक अली अजगर बोहरी (५५) यांची गावठी पिस्तुलने गोळी झाडून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे मध्यरात्रीपासून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अमळनेर शहराच्या माध्यवर्ती भागात असलेला बोहरी पेट्रोल पंप बंद करुन अली अजगर हे दुचाकीने घरी निघाले होते. पंपापासून दीडशे फूटापर्यंत गेल्यावर तिघा-चौघांनी त्यांना हेरले आणि जवळून त्यांच्या छातीखाली एक गोळी झाडली. क्षणातच अज्ञात हल्लेखोर पसार झाले. जखमी बोहरी दुचाकीने पंपावर आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांना घटना समजली. त्यांनी बोहरी यांना रिक्षाने दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वैयक्तिक कारणातून हत्येचा संशय….

वैयक्तिक वादातून बोहरी यांची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा अंदाज आहे. जर गुंडांना रोकड लंपास करायची असती तर त्यांनी हत्या केल्यानंतर रोकड लंपास केली असती परंतु रोकड दुचाकीच्या डिकीत सुरक्षित होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.