Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणमुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटची मृत्यूशी झुंज संपली!

मुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटची मृत्यूशी झुंज संपली!

Murud, Halicopter Crashed

महत्वाचे….
१. महिला पायलट पेनी चौधरी यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरानिधन
२. मुंबईतील नौदलाच्याहॉस्पिटलमध्ये उपाचार सुरु होते
३. रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडाली होती


मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलट पेनी चौधरी यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरु होते.

रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील नांदगाव-मोरा बंदर येथे १० मार्चला भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. हेलिकॉप्टर मुंबईहून मुरुडच्या दिशेने निघाले असताना काशिदजवळ आले असता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करताना हा अपघात घडला होता. या अपघातात पायलट पेनी चौधरी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, तर त्यांच्यासोबत असलेले अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले होते. पेनी चौधरी यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेले १७ दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments