Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणतारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट-रामदास कदम

तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट-रामदास कदम

Ramdas Kadamपालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरात मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखाने आणि प्रकल्पांमुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढली असली तरी सन 2010 च्या तुलनेत वायु प्रदुषणाच्या गुणांकात घट झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे सन 2010 मध्ये असलेले 72 गुणांक वायु प्रदूषण आता 50 गुणांकापर्यंत घटले आहे. अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री. कदम म्हणाले, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने हवा प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 व पाणी प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 अंतर्गत वेळोवेळी कार्यवाही केली आहे. यांतर्गत 11 कारखान्यांवर कार्यवाही देखील करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या दंडात्मक रकमेतही वाढ करण्यात येईल.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री आनंद ठाकुर, भाई जगताप, हेमंत टकले, प्रविण दरेकर, कपिल पाटील, श्रीमती हुस्नबानो खलिफे आदिंनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments