Thursday, March 28, 2024
Homeकोंकणपालघरप्रदीप शर्मांचा प्रचार करणा-या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

प्रदीप शर्मांचा प्रचार करणा-या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Pradeep Sharma
शिवसेनेचे नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार प्रदीप शर्मांचा प्रचार पोलीस उपनिरीक्षकला चांगलाच माहगात पडला. फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणा-यापोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्यार गुन्हा दाखल करण्यात आला.

शासकीय सेवेत असताना एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विचारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शिवाजी पालवे यांनी तुलिंज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, वसई स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांची निवडणुकांपूर्वी पालघरच्या कल्याण शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र, विचारे तिथे हजर न होतो, मेडिकल रजेवर गेले होते. प्रदीप शर्मा यांनी 15 ऑक्टोबर रोजी विरार पूर्व फुलपाडा परिसरात मोटारसायकल रॅली काढली होती. यासाठी भाजपचे खासदार सत्यपाल सिंह हे प्रचारासाठी नालासोपाऱ्यात आले होते. त्यावेळी सत्यपाल सिंह यांनी विचारे यांची भेटीचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. तसेच प्रदीप शर्मा यांच्या कार्याची माहितीही विचारे यांनी पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्ट फेसबुकवर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. ही बाब गांभीर्याने घेण्यात आली.

शासकीय सेवेत असताना राजकीय उमेदवार, प्रचारक यांच्यासोबत फोटो काढणे. त्यांची माहिती ती पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करणे, मतदारांवर प्रभाव टाकणे हा लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 129 (2) (सी) गुन्हा आहे. या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी पालवे यांनी तुलिंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments