Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणसुनील तटकरेंची कन्या अदिती विरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर

सुनील तटकरेंची कन्या अदिती विरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर

रायगड : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अवधूत तटकरेंना शिवसेनेने धक्का दिला. शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, तर राष्ट्रवादीकडून खासदार सुनिल तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचं नाव निश्चित आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध घोसाळकर असा सामना रंगणार आहे.

मातोश्रीवर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. दुसरीकडे, अदिती तटकरे यांच्या वतीने सोशल मीडियावर प्रचाराची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे घोसाळकर आणि तटकरे यांच्यात रंगतदार निवडणूक होईल.

मागच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकीटावर अवधूत तटकरे निवडून आले होते. अवधूत यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुद्ध तटकरे अशी लढत होण्याची चिन्हं होती. अवधूत तटकरेंना उमेदवारी जाहीर झाली असती तर श्रीवर्धन मतदार संघात तटकरे कुटुंबाविरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अडचण झाली असती. परंतु घोसाळकरांना तिकीट मिळाल्यामुळे चुलत भावंडांमधला संघर्ष टळला आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांना 38 हजारांची मोठी लीड मिळाली होती. तटकरे खासदारपदी निवडून आल्यामुळे शिवसैनिक नाराज होते. त्यातच अदिती तटकरे यांच्या समोर शिवसेनेचा उमेदवार कोण हे स्पष्ट होत नसल्यामुळे निवडणूक एकतर्फी होण्याची भीती शिवसैनिकांना होती. मात्र विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नवचैतन्य आलं. मात्र या लढाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments