निकालाआधीच दापोलीत शिवसेना,राष्ट्रवादीची आतषबाजी

- Advertisement -

ncp shivsena dapoli
रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होती. सोमवारी मतदान झाले. गुरुवारी निकाल लागणार आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच आतषबाजी करुन आनंदोत्सव साजर केला.

दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम अशी लढत झाली. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिका-यांना आमचाच विजय होणार यावर विश्वास आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. यामुळे सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केला.

मतदारांमध्येही याचीच चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या या उत्साहामुळे तेथील मतदारही चक्रावले आहेत. नेमका विजय कोणाच होणार. निकाल काय लागणार. एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना निवडूण येण्याचा विश्वास कसा हीच जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here