Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणसिंधुदुर्गदीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा एल्गार!

दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा एल्गार!

Deepak Kesarkar,Rajan Krishna Teli,Assembly Elections 2019सिंधुदुर्ग: युतीमध्ये जागा वाटपानंतर गोंधळ उडालेला आहे. कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे राज्य चिटणीस राजन तेली यांनी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. यावेळी दीपक केसरकर यांचा पराभव अटळ आहे आणि त्यासाठीच मी रिंगणात उतरलो आहेअसा एल्गार राजन तेली यांनी केला.

दीपक केसरकर यांची ही तीसरी टर्म आहे. सावंतवाडी मतदारसंघात दोनदा विजयी झालेला उमेदवार तीसऱ्यांदा विजयी होऊ शकलेला नाहीअसा सावंतवाडीचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुसण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांच्याकडून सुरु आहे. मात्रशिवसेनेचा मित्र पक्ष भाजपनेच यावेळी केसरकर यांच्या पराभवाचा विडा उचलल्याचं चित्र आहे.

त्यासाठी राजन तेली हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत. याबाबत राजन तेली यांनी जाहीरही केलं. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावेळी नारायण राणेंसह विरोधकांना धोबीपछाड दिला. त्यामुळे यंदा राणेंच्या निशाण्यावरही दीपक केसरकर आहेत. त्यामुळे सध्या सांवंतवाडी मतदारसंघातील राजकारण तापलेलं दिसत आहे. आता दीपक केसरकर इतिहास पुसणार कीराजन तेली त्यांना पराभूत करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र राणे कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशानंतर कोकणात भाजपा विरुध्द शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments