Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणभाजपच्या नितेश राणे विरुध्द शिवसेनेचे संदेश पारकर भिडणार

भाजपच्या नितेश राणे विरुध्द शिवसेनेचे संदेश पारकर भिडणार

Nitesh Rane-Sandesh Parkarसिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात भाजपावासी झालेल्या नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या संदेश पारकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राणे विरूध्द भाजपातील,तसेच शिवसेनेतील विरोधक एकवटले आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते. परंतु सेनेपासून फारकत घेऊन ते राणेंविरूध्द मैदानात उतरले आहेत.

भाजपचे संदेश पारकर यांनी बंडखोरी केली असून, आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती जाहीर झाली. तशीच ती सिंधुदुर्गात पण जाहीर झाली. भाजपने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर इथल्या युतीत ठिणगी पडली. पूर्वीचे राणेंचे कट्टर शिलेदार सतीश सावंत हे काहीच दिवसांपूर्वी राणेंना सोडून शिवसेनेत गेले. शिवसेनेने त्यांची लोकप्रियता जाणून, युती असूनही त्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून समोर आणलं. युतीचा धर्म भाजपने लोकसभेच्या निवडणुकीवेळीच पाळला नसल्याचा आरोपही यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला.

मी पुढचे तेरा दिवस शिवसेना किंवा शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यांविरोधात टीका करणार नाही, असा पवित्रा भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांनी घेतला आहे. मी ही निवडणूक माझ्या मतदारांसाठी लढवतोय. मी महायुतीचा उमेदवार आहे. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय, एका भाजपच्या उमेदवारांमुळे राज्यातील इतर भाजपचे उमेदवार अडचणीत येऊ नये, म्हणून मी कणकवलीतल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार आहे, त्यांची मदत सुद्धा मला हवी आहे, असं नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजपाने बंडोबांना थंड करण्याची भाषा केली. परंतु कणकवलीत युतीमध्ये बेबनाव झालं असून युतीचे नेते गप्प का आहेत. अशी चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments