Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeकोंकणठाणेइंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हलला कलाप्रेमींची दाद

इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हलला कलाप्रेमींची दाद

“ाणे, दि. 4 – उपवन येथील ऍम्पी थिएटरमध्ये 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टीव्हल संपन्न झाला. या फेस्टीव्हलला राज्यातून उपस्थित कलारसिकांनी दाद दिली.

भारतीय शास्त्राrय नृत्यकला अबाधित रहावी, तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळावे तसेच नवीन कलाकार घडावेत या उद्देशाने अरात्रिका इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस आणि संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमानेय् या डान्स फेस्टीव्हलचे आयोजन करण्यातआले होते.

या डान्स फेस्टीव्हलचा शुभारंभ पावार 1 फेब्रुवारी 2019 रोजी अरात्रिका इन्स्टीट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस्च्या निवेदिता मुखर्जी, नृत्य कलाकार शुभा कोपुंबु, आशा सुनीलकुमार, रजनी, पत्रकार श्यामहरी पा यांच्या उपस्थितीत झाला.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात जपान येथील कलाकारांप्रमाणेच भारतातील 52 नृत्य संस्थांमधील सुमारे 200 कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन पेले. या महोत्सवासाठी 300 संस्थांच्या प्रवेशिका आल्या होत्या, त्यातीलनिवडक संस्थानाच कला सादर करण्याची संधी देण्यात आली.

आसामच्या सत्तारिया या नृत्य प्रकाराला नुकताच शास्त्राrय नृत्याचा दर्जा मिळाला आहे. तो नृत्य प्रकार ठाण्यात प्रथमच या महोत्सवाच्या व्यासपीठावर सादर करण्यात आला.

तसेच या महोत्सवात एक परिसंवादही आयोजित करण्यात आला होता. `शास्त्राrय नृत्यासमोरील प्रश्न, आव्हाने आणि भविष्यातील दिशा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात ओडीसी नृत्यकलाकार झेलम परांजपे, पार्वती दत्ता आणिइतर मान्यवर सहभागी झाले होते. या शिवाय शास्त्राrय नृत्य करताना काही दुखापत झाल्यास येणाऱया अडचणींवर कशी मात करावी याबाबत मानसोपचार तज्ञ डॉ. पुर्णिमा कारखानीस यांनी तर नृत्यातही करिअर करता येऊ शकते याबाबतही तज्ञांनीमार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments