Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeकोंकणठाणेखासदार राजन विचारेंच्या पुढाकाराने दिव्यांगांनां मिळणार आवश्यक असलेल्या वस्तू

खासदार राजन विचारेंच्या पुढाकाराने दिव्यांगांनां मिळणार आवश्यक असलेल्या वस्तू

ठाणे लोकसभा मतदार संघातील दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करत खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने २५,२६,२७ जानेवारी रोजी दिव्यांग सहाय्य शिबिर आयोजित केले होते. यासाठी केंद्र शासन व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपुर (ALMICO) कंपनीचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नाव नोंदी व मोजमाप घेण्यात आले व महिन्याभरात पुन्हा शिबिर आयोजित करून प्रत्यक्ष लाभार्थींना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांगांना काही वेळातच उपस्थित जागेवर दिव्यांग प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखले हातोहात मिळाले याची सोय खासदार विचारे यांनी केली होती. दिव्यंगांना सादर  दाखल्यांसाठी खूप वेळ खर्ची घालावा लागत होता.खासदार राजन विचारेंनी काही वेळातच शिबिरांच्या जागेवर दाखले मिळवून दिल्याबद्दल सर्व लाभार्थींनी खासदारांचे मनपूर्वक आभार मानले.

शिबिराचा शुभारंभ २५ जानेवारी रोजी मनीषा विद्यालय वाशी नवी मुंबई  येथून झाला व या शिबिरात तब्बल ६५० लोकांनी नावे नोंदवली. २६  तारखेला आमदार प्रताप सरनाईक साहेबांचे जनसंपर्क कार्यालय हटकेश मिरा रोड पूर्व येथे तब्बल ४०० पेक्षा जास्त दिव्यांगांनी शिबिराचा फायदा घेतला . तर २७ तारखेला शिव समर्थ विद्यालया यांचे पटांगण ठाणे येथे झाला. या शिबिराचा  तब्बल ८०० हून जास्त दिव्यांगांनी लाभ मिळवला.

या शिबिरांच्यासाठी मा.पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार श्री प्रतापजी सरनाईक, आमदार श्री सुभाषजी भोईर, आमदार श्री रवींद्रजी फाटक, शिवसेना उपनेते व झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजयजी नाहटा, ठाण्याच्या महापौर सौ.मिनक्षीताई शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेशजी म्हस्के,मिरा भाईंदर जिल्हा प्रमुख श्री प्रभाकर म्हात्रे, ऐरोली विधानसभा जिल्हा प्रमुख श्री द्वारकानाथ भोईर, बेलापूर विधानसभा जिल्हा प्रमुख श्री विठ्ठल मोरे, गटनेते श्री दिलीप बारटक्के व नवी मुंबई, मीरा-भाईंदर व ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments