Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeकोंकणठाणेशालेय विद्यार्थ्यांसाठीचे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान पोहोचले ठाण्यात

शालेय विद्यार्थ्यांसाठीचे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान पोहोचले ठाण्यात

ठाणे, दि. २९, (प्रतिनिधी) : देशात सुरक्षितपणे वाहन चालवण्याची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम ठाण्यातील एसव्हीएसएस ट्री हाउस स्कूलमध्ये घेण्यात आला.

होंडा २व्हीलर्स इंडियाने ठाण्यातील एसव्हीएसएस ट्री हाउस स्कूलमधील ४ दिवसांच्या उपक्रमामध्ये १७00 हून अधिक जणांना रस्ते सुरक्षेविषयक जागृत करण्यात आले. त्यामध्ये ‘प्रत्येकाची सुरक्षितता’ या उद्देशांतर्गत 1600 हून अधिक बालके व 150 प्रौढ सहभागी झाले होते.

लहान मुलांना रस्त्याविषयक जागृत करण्यासाठी जानेवारी 2019 पासून नवे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे, दरमहा विविध शहरांतील १० शाळांतील १५,000 हून अधिक लहान मुले व प्रौढ यांचा समावेश करण्याचे होंडाचे उद्दिष्ट आहे. या महिन्यात हा उपक्रम ठाण्यासह १० शहरांमध्ये विस्तारण्यात आला व या उपक्रमाने आतापर्यंत १७,000 बालके व ५,000 प्रौढ यांना जागृत केले आहे.

याविषयी बोलताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे ब्रँड व कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले की, “होंडा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि आतापर्यंत आम्ही 25 लाखांहून अधिक भारतीयांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. या भव्य अभियानाद्वारे, आता शालेय विद्यार्थी हसतखेळत शिकत आहेत बालकांनी संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षेचे दूत बनावे, हा आमचा उद्देश आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments