Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
HomeकोंकणठाणेBSUP च्या घरवाटपामध्ये दिव्यांगांची क्रूर चेष्टा

BSUP च्या घरवाटपामध्ये दिव्यांगांची क्रूर चेष्टा

ठाणे (प्रतिनिधी)-   ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना बीएसयुपीची घरे  देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या घरांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दिव्यांगांना पालिकेच्या मुख्यालयात बोलावण्यात येत आहे. एकीकडे दिव्यांगांकडे अर्थार्जनाचे ठोस साधन नसतानाही त्यांना लांबवरच्या दिव्यांगांना मोठा खर्च करून द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.  एकूणच घर वाटपाच्या नावाखाली दिव्यांगांची क्रूर चेष्टाच केली जात असल्याचा आरोप, विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे युसूफ खान यांनी केला आहे. दरम्यान,नगरसेवक राजन किणे यांनी ठाण्यातील दिव्यांगांना घरे देण्यासाठी सभागृहातआवाज उठवणार असल्याचे आश्वासन युसूफ खान यांना दिले आहे.

विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेने या संदर्भात ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.  दिव्यांगांच्या मागणीच्या अनुषंगाने दिव्यांगांना 190 घरांचे वाटप करण्यात येणार आहे.   हे अर्ज करण्यासाठी संबधित दिव्यांगांना स्वतः ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये येण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.  एका दिव्यांगाला मुंब्रा भागातून ठामपा मुख्यालय गाठायचे असल्यास किमान 300 रुपये खर्च येतो. उत्पन्न मर्यादीत असल्याने हा खर्च करण्याची ऐपत दिव्यांगांची नाही.  त्यामुळे प्रभाग समितीमध्येच त्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे,सुधारीत दिव्यांग व्यक्ती कायदा 2016 कायद्यामध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणार्‍या सर्वांनाच शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आलेले असतानाही  ठामपा केवळ 80 टक्के दिव्यांग असणार्‍यांनाच ही घरे देण्यात येणार आहेत. म्हणजेच या कायद्याचेही अवमूल्यन करण्यात येत असल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

दुसरे म्हणजे म्हणजे बीएसयूपीच्या माध्यमातून देण्यात येणारी ही घरे कुठे, कशी मोफत देण्यात येणार आहेत किंवा अर्ज पात्र झाल्यावर सदर दिव्यांग लाभार्थ्यांना खोली ताब्यात देण्या पूर्वी किती रक्कम घेण्यात येईल, या जाहिरातीमध्ये कोणाला घर देण्यात येणार आहे. घरासाठीचे निकष काय आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे घरे आहेत, त्यांचा घरे देणार आहेत की, नाही, याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. हे देखील जाहीर करण्यात आलेले नाही. स्टॉल वाटप करतानाही अशीच पद्धत वापरण्यात आलेली असल्यामुळे अनेक दिव्यांगांना आपला व्यवसायही सुरु करता आलेला नाही. आता दिव्यांगांसाठी काम करणार्‍या  संघटनांशी चर्चा न करता या योजनेची अंमलबजावणी करणे म्हणजे आपणाकडून पुन्हा एकदा त्यांचा छळच केला जाणार असल्याची शक्यता आहे, असेही खान यांनी म्हटले आहे. दरम्यान,नगरसेवक राजन किणे यांनी ठाण्यातील दिव्यांगांना घरे देण्यासाठी सभागृहातआवाज उठवणार असल्याचे आश्वासन युसूफ खान यांना दिले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments