Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणठाणे11 ऑगस्ट रोजी नगरसेवक संजय भोईर यांच्या पुढाकाराने `यु थ्री - मॉन्सून...

11 ऑगस्ट रोजी नगरसेवक संजय भोईर यांच्या पुढाकाराने `यु थ्री – मॉन्सून मॅरेथॉन’ स्पर्धा

ठाणे : 11 ऑगस्ट 2019 रोजी `यु थ्री – मॉन्सून मॅरेथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत आयोजक नगरसेवक संजय भोईर यांनी दिली.
पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा संजय भोईर, नगरसेवक भूषण भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळकूम-ढोकाळी-कोलशेत या मार्गावर सदर स्पर्धा होणार आहे.  युनायटेड थ्री स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र ऍथलेटीक असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱया या स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ ठाणे अरबेनिया आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे यांचे सहकार्य लाभले आहे.  संकल्प सेवा मंडळ व साई जलाराम प्रतिष्ठान यांचे स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आपली महापालिका आपले शहर स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. तर आपल्या नागरी प्राधिकरणांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. या उद्देशाने यू थ्री स्पोर्ट्स क्लब ने `ग्रीन सिटी क्लिन सिटी’ ही संकल्पना ठेऊन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून गरीब मुलांच्या शिक्षणासाठीही आर्थिक सहकार्य केले जाते. तीन गटांत होणाऱया या मॅरेथॉनसाठी पहिला गट 10 कि.मी. अंतरासाठी 18 ते 35 वर्षे आणि 36 ते 60 वर्षे असा आहे. दुसरा गट 5 कि.मी. अंतरासाठी 18 ते 35 वर्षे आणि 36 ते 60 वर्षे आणि तिसरा गट 3 कि.मी. अंतरासाठी `रन फॉर फन’ असा आहे. त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठी 1 कि.मी. अंतरासाठी मॅरेथॉन होणार आहे. आतापर्यंत 1200 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्याच प्रमाणे ठाणे जिह्यातील शाळा, महाविद्यालये यातून सुमारे 3000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक संजय भोईर यांनी केले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी https://www.townscript.com/e/u3-monsoon-marathon-200124 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी  माहिती संजय भोईर यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments